(Provident fund )प्रॉव्हिडंट फंड रक्कम (pf advance)मोबाईल द्वारे कशी काढावी.

Spread the love

How to withdraw provident fund amount

Spread the love

प्रॉव्हिडंट फंड खात्यातील रक्कम काढणे अगदी सोपे आहे . मोबाईल द्वारे सुद्धा आपण प्रॉव्हिडंट फंड रक्कम काढू शकता. खालील प्रकारे तुम्ही रक्कम काढू शकता.

1)सर्वप्रथम खाली दिलेल्या वेबसाईट द्वारे तुम्हाला प्रॉव्हिडंट फंड पोर्टलवर जावे लागेल. (तुमचे क्रोम ब्राउजर चे सेटिंग मध्ये  डेस्कटॉप साइट केलेली असावी.)

https://unifiedportal-mem.epfindia.gov.in

त्यानंतर खालील प्रकारे member e- seva नावाचे पोर्टल उघडेल.

2) यामध्ये तुम्हाला तुमचा युएएन(UAN) क्रमांक भरावा लागेल व पासवर्डद्वारे लॉग इन करावे लागेल.3) पासवर्ड माहिती नसल्यास फॉर्गोट पासवर्ड द्वारे तुम्ही पासवर्ड बदलून घेऊ शकता.4) प्रॉव्हिडंट फंड खात्यातील रक्कम काढण्याकरिता तुमची केवायसी पूर्ण असणे गरजेचे आहे. के वाय सी चे पूर्ण असेल तर ती पूर्ण करून घ्यावी .5) त्यानंतर खाली दिलेल्या प्रमाणे ऑनलाईन सर्विसेस या टॅब द्वारे क्लेम या ऑप्शन वर जावे.6) त्यानंतर तुम्हाला तुमचा पासबुक खाते क्रमांक टाकून व्हेरिफाय करावे लागेल.7) त्यानंतर पीएफ अडवान्स हे ऑप्शन निवडावे लागेल.

8)त्यानंतर आपण ॲडव्हान्स कशासाठी काढत आहात ते निवडून रक्कम भरावी लागेल.

9) त्यानंतर तुम्हाला तुमचा ऍड्रेस टाकावा लागेल व तुमचे बँक पासबुक खात्याचे फोटो अपलोड करावे लागेल.

10) सर्व माहिती भरून सबमिट करावे लागेल व तुम्हाला शेवटी मोबाईलवर सहा क्रमांकाचा आधार ओटीपी येईल तो ओटीपी टाकल्यानंतर तुमचा क्लेम सक्सेसफुल सबमिट होईल.

अशा सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचे प्रॉव्हिडंट फंड खात्यातील ऍडव्हान्स रक्कम काढू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *