Inresting facts about Nasa’s Parker solar probe|नासाचे पारकर सोलर प्रोब- विशेष माहिती.

Spread the love

अमेरिकेच्या नासा संस्थेचे पारकर सोलार प्रोब पोहोचले सूर्याच्या अति जवळचा भाग म्हणजे कोरोना, मध्ये जाणून घेऊया अधिक माहिती.

Spread the love

पारकर सोलर प्रोब नासाचे ऐतिहासिक महत्वाचे मिशन असून त्याची घोषणा 2009 मध्ये करण्यात आली होती. पारकर सोलार प्रोबची लॉन्चिंग 12 ऑगस्ट 2018 मध्ये करण्यात आली होती आणि ते 2025 पर्यंत सूर्याच्या कक्षेतील विविध माहिती गोळा करून नासातील वैज्ञानिकांपर्यंत पोहोचवत राहील. सध्या सूर्याच्या अति जवळच्या भागांमध्ये म्हणजे कोरोना मध्ये त्याने प्रवेश केलेला आहे .कुठलेही यान सूर्याच्या एवढ्या जवळ जाण्यास यशस्वी झाले नाही . पारकर सोलार प्रोबेने ही किमया केली आहे. जाणून घेऊया त्याच्या काही महत्त्वाच्या बाबी खालील प्रमाणे-

1) पारकर सोलार प्रोब करिता आलेला खर्च –

पारकर सोलर प्रोब एका उच्च तकनीकी पासून बनवण्यात आलेले आहे .जेणेकरून त्यावर सूर्याच्या घातक चुंबकीय क्षेत्राचा, तापमानाचा तसेच इन्फ्रारेड किरणांचा परिणाम होणार नाही. त्याकरिता त्याला आलेला एकूण खर्च नासा नुसार 150 कोटी अमेरिकी डॉलर रुपये आलेला आहे.

2) पारकर सोलार प्रोब ची गती

2018 मध्ये लॉन्च करण्यात आलेल्या या मिशन मध्ये पारकर सोलर प्रोब च्या वेगाने विशेष महत्त्वाची भूमिका बजावली आहे पृथ्वीपासून सूर्याचे अंतर जवळपास 147.19 मिलियन किलोमीटर आहे. नासातील वैज्ञानिकांनुसार प्रोबची गती – सहा लाख 90 हजार प्रति घंटा आहे जी प्रकाशाच्या एकूण गतीच्या 0.064 % आहे.

3) पारकर सोलार प्रोब बनवणारी कंपनी

अति उच्चतम कार्बन पासून बनवण्यात आलेल्या या पारकर सोलार प्रोब चे मॅन्युफॅक्चरिंग “ अप्लाइड फिजिक्स लॅबोरेटरी ” द्वारे करण्यात आले आहे.

4) पारकर सोलार प्रोबचे मिशन

पारकर सोलार प्रोब चे महत्वाचे तीन मिशन आहेत ते खालील प्रमाणे.

1) सूर्याचे चुंबकीय क्षेत्राचे अध्ययन करणे.

2) सोलार विंड ऊर्जेचे अध्ययन करणे.

3) सूर्याचे जवळ जाऊन इतर माहिती गोळा करणे.

अशाप्रकारे नासाचे सोलर प्रोबचे चे महत्वाचे तिन मिशन असून त्याने केलेली ऐतिहासिक वाटचाल भविष्यात संपूर्ण मानव जाती करिता मौल्यवान ठरेल. त्याने सूर्याचे महत्वाचे वातावरण म्हणजे कोरोना मध्ये प्रवेश केला असून 2025 पर्यंत ते सूर्याच्या जवळ जाऊन विविध प्रकारे माहिती गोळा करेल व ते नासाचे वैज्ञानिकांनी पर्यंत पोहोचवेल.

Leave a Reply

Your email address will not be published.