New year resolution ideas| नवीन वर्ष 2022 करिता संकल्प

Spread the love

New year 2022 top 10 resolutions| नविन वर्ष 2022 टॉप 10
संकल्प

Spread the love

मागील दोन वर्षांपासून आपण सर्वजण कोरोना मुळे खुप दिवस लॉकडाउन अवस्थेत होतो. आपण विविध संकल्प किंवा रेसोल्युशन असणार परंतु आपण या कोरणा महामारी मुळे ते पूर्ण करू शकलो नाही . चला तर या नवीन वर्षामध्ये आपल्या राहिलेल्या संकल्पांना पूर्ण करूया .2022 हे नवीन वर्ष सुरू होत असून या वर्षाला हात खोलून मनमोकळेपणाने स्वागत करायला हवे व नवीन आशेने व नवीन जोमाने सुरुवात करायला हवी. 2022 हे वर्ष तुम्हा सर्वांकरिता नव्या उमेदीने सुरू करण्याकरिता आम्ही काही महत्त्वपूर्ण संकल्प तुमच्यासाठी निवडले आहेत. दरवर्षी आपण संकल्प करतो आणि ते पूर्णत्वास जात नाहीत परंतु यावर्षी आपण नवीन संकल्प करूया आणि त्यास पूर्णत्वास नेऊयात.

नवीन वर्ष 2022 करिता तुम्ही विविध प्रकारे संकल्प घेऊ शकता . त्यातील काही महत्त्वपूर्ण संकल्प आम्ही तुमच्या करिता निवडले असून त्यातील तुम्ही सुद्धा संकल्प तुमच्याकरिता निवडू शकता.

1) जिम जॉईन करणे-

आजच्या युवा पिढीला फिटनेस मध्ये विशेष रुची आहे . परंतु कोरूना मध्ये मागील काही बऱ्याच दिवसांपासून जिम बंद असल्यामुळे आपले फिटनेस कडे दुर्लक्ष झाले. याही हिवाळ्याच्या ऋतूमध्ये तुम्ही जिम जॉईन करू शकता. काहींना वजन कमी करायचे असते तर काहींना वजन वाढवायचे असते. तर काहींना सिक्स पॅक ॲब्स बनवायचे असते. लहान असो किंवा मोठे सर्वांनी जिम जॉईन करायला हवे आणि वेळात वेळ काढुन नियमित फिटनेस कडे लक्ष द्यायला हवे.

2) फोटोग्राफी-

वर्ष 2022 मध्ये तुम्ही एक छान नवीन कॅमेरा घेऊन फोटोग्राफी सुरू करू शकता. फोटोग्राफीला एक छंदा सोबतच करियर म्हणून सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता. फोटोग्राफी द्वारे तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी लोकांपर्यंत पोहोचवू शकता. तुम्ही जर चांगले फोटोग्राफर असाल तर करिअरमध्ये त्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. फोटोग्राफी मध्ये विविध प्रकार आहेत. फोटोग्राफी तुम्ही मोबाईल द्वारे सुद्धा सुरू करू शकता. आजच्या काळात खूप चांगल्या प्रकारचे मेगापिक्सेल असलेले मोबाईल फोन उपलब्ध आहेत. त्याकरता तुम्हाला कॅमेरा घेण्याची आवश्यकता नाही. फोटोग्राफी चा दुसरा प्रकार म्हणजे ड्रोन कॅमेरा द्वारे फोटोग्राफी करणे. आजच्या युगात ड्रोन च्या मदतीने विविध प्रकारचे शूटिंग व फोटोग्राफी केली जाते. जर तुम्हाला फोटोग्राफीमध्ये आवड असेल तर तुम्ही ड्रोन फोटोग्राफी चा जरूर विचार करायला हवा.

3) पेंटिंग-

जर तुम्हाला सुद्धा पेंटिंग करायला आवडत असेल तर लगेच तुम्ही सुरुवात करायला हवी. आपल्या मनातील विचार व संकल्पना पेंटिंग द्वारे आपण मांडू शकतो. आर्टिस्ट द्वारे विविध पेंटिंग केल्या जातात .परंतु पेंटिंग करायला आर्टिस्ट असणे गरजेचे नाही. तुम्ही सुद्धा कॅनवास ,ब्रश व कलर द्वारे पेंटिंग करायला सुरुवात करू शकता. चित्रकलेचे एक वेगळेच विश्व आहे . पेंटिंग करता करता तुम्हाला किती तास निघून गेले ते कळत सुद्धा नाही.

पेंटिंग चे विविध प्रकार आहेत- त्यामध्ये ऑइल पेंटिंग, एब्सट्रैक पेंटिंग, ऍक्रेलिक पेंटिंग, स्टील पेंटिंग पोर्ट्रेट पेंटिंग से अनेक विविध प्रकार आहेत. त्यामध्ये तुम्हाला ज्या प्रकारात पारंगत व्हायचे आहे तो प्रकार तुम्ही निवडून पेंटिंग ला एक छंद म्हणून किंवा करिअर म्हणून सुरुवात करू शकता.

4) जॉगिंग किंवा सायकलिंग सुरू करणे-

2022 वर्षाची सुरुवात तुम्ही सकाळी उठून जॉगिंगला जाणे किंवा सायकलिंग करणे या संकल्पाने करू शकता. संपूर्ण जगाला लॉक डाऊन मध्ये परावर्तित करणाऱ्या कोरोना सारख्या महामारी च्या काळात फिटनेस कडे लक्ष देण्याची खूप आवश्यकता आहे. तुम्ही एक नवीन सायकल विकत घेऊन सायकलिंग करू शकता किंवा जॉगिंगला जाणे द्वारे स्वतःला फिट ठेवू शकता. आजच्या धावपळीच्या युगात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे .त्यामुळे वेळात वेळ काढून तुम्ही अशा ऍक्टिव्हिटी केल्याच पाहिजेत चला तर नवीन वर्षाची सुरुवात सकाळी उठून जॉगिंग किंवा रनिंग आणि सायकलिंग द्वारे करूयात.

5) फार्मिंग-

आजच्या नवीन पिढीचे शेती व्यवसायाबद्दल दुर्लक्ष दिसून येते प्रत्येकाला डॉक्टर ,इंजिनियर ,सायन्टीस्ट व्हायचे असते परंतु फार्मर नाही .आजच्या नव्या पिढीचे फार्मिंग मध्ये आवड असायला हवी. कारण भारताला त्याची नितांत आवश्यकता आहे . शेती हा असा विषय आहे ज्या मध्ये आधुनिकीकरणाची नितांत आवश्यकता आहे . भारत हा कृषीप्रधान देश असून जास्तीत जास्त लोक कृषी क्षेत्रामध्ये आहेत .आजच्या काळात नवीन पिढी नव्या तंत्रज्ञानाने शेतीकडे वळत आहे. काही नवीन पिढी तर जॉब सोडून शेतीचे नवीन पद्धतीने यांत्रिकीकरणाद्वारे भरघोस उत्पन्न मिळवत आहेत. तुम्हीसुद्धा फार्मिंग बद्दल नजरीया बदलून शेती क्षेत्रामध्ये 2022 या वर्षात आधुनिकीकरणात द्वारे आवड व व्यवसाय गृहीत धरून सुरुवात करायला हवी.

6) ट्रॅव्हलिंग-

कोरूना च्या महामारी मध्ये संपूर्ण जगात वाहतूक सेवा बंद होती. त्यामुळे सर्वांना बाहेर कोठेही फिरायला जाता आले नाही . 2022 या वर्षाची सुरुवात तुम्ही विविध डेस्टिनेशन ची प्लॅनिंग करून फिरायला जाऊ शकता. संपूर्ण वर्षातील विविध ठिकाणी फिरायला जाण्याकरिता प्लॅनिंग तुम्ही आत्ताच करू शकता.

7) ब्लोगिंग-

2022 या वर्षाची सुरुवात तुम्ही एका नवीन छंदाने करू शकता, ते म्हणजे ब्लॉगींग आहे. तुमचे विचार तुम्ही तुमच्या ब्लॉग द्वारे लोकांपर्यंत पोहोचवू शकता. एक छंद म्हणून किंवा करिअर म्हणून तुम्ही ब्लोगिंग सुरू करायला हवी. जर तुम्हाला लिखाणाचे आवड असेल आणि तुमची भाषेवर चांगली पकड असेल तर तुम्ही ब्लॉगींग सुरु करायला हवी. ब्लॉगिंग तुम्ही ब्लॉगर नावाचे साईट किंवा वर्डप्रेस द्वारे करू शकता.

8) युट्युब वर चॅनेल उघडणे

2022 या वर्षाची सुरुवात तुम्ही युट्युब वर चैनल उघडून करू शकता. जर तुमच्याकडे एखाद्या क्षेत्रातील ज्ञान असेल किंवा तुम्ही चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत व्हिडीओस द्वारे माहिती पोहोचवू शकता. तर तुम्ही नक्कीच यूट्यूब चैनल सुरू करायला हवे युट्युब द्वारे तुम्ही छंद म्हणून सुरुवात करू शकता तसेच करियर म्हणून सुद्धा सुरुवात करू शकता .युट्युब तसेच फेसबुक इंस्टाग्राम अशा विविध माध्यमांद्वारे तुम्ही पैसे सुद्धा कमवू शकता.

9) स्पोर्ट्स-

2022 या वर्षाची सुरुवात आपण आपल्याला आवड असणाऱ्या खेळाने सुरुवात करुया .बहुतेक जणांना स्पोर्ट्स मध्ये आवड असते परंतु काही कारणांमुळे ते स्पोर्ट्स मध्ये वेळ देऊ शकत नाहीत. करियर मध्ये स्पोर्ट्स ला खूप महत्त्वाचे स्थान आहे. तुम्ही जास्त स्पोर्ट्स मध्ये चांगले असाल तर भविष्यात तुम्हाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो. भारत सरकार स्पोर्ट्स ला वाव मिळण्यासाठी भरपूर प्रयत्न करत आहे. अभ्यासासोबतच इतर इतर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी मध्ये सर्वांनी भाग घ्यायला हवा. कुठल्या एका खेळामध्ये आपण सहभागी व्हायला हवे जेणेकरून आपले स्वास्थ निरोगी राहते तसेच आपला शारीरिक व मानसिक विकास होतो.

10) गोल-

प्रत्येकाचे त्यांच्या आयुष्यामध्ये एक गोल असते .तुमच्या सुद्धा काहीना काही लक्ष किंवा गोल असेल. तुम्हाला आयुष्यात काही अचूक करायचे असेल. तुम्ही त्याकरिता बर्‍याचदा अ अयशस्वी सुद्धा झाले असाल. कुठेतरी काहीतरी कमी राहिली असेल. तर या नवीन वर्षाची सुरुवात एका नव्या जोमाने करायची आहे. दोन्ही हात खोलून या नवीन वर्षाला वेलकम करूया. व आत्मविश्वासाने व परिश्रम करून आपले लक्ष पूर्ण करूया. खूप जणांना नोकरी मिळवायची असते तर काही जणांचे शिक्षण सुरू असेल. त्यांना अभ्यासामध्ये चांगले मार्क मिळवायचे असतील. यावर्षी आपण मेहनतीने पुन्हा सुरुवात करू व चांगले यश संपादन करूयात.

उपरोक्त प्रमाणे तुम्हा सर्वांकरिता आम्ही दहा संकल्पांची निवड केली आहे हे वर्ष तुम्हा सर्वांसाठी निरोगी व आनंदी जावो व तुम्ही आयुष्यात भरपूर यश संपादन प्राप्त करावे हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवा

Leave a Reply

Your email address will not be published.