प्रॉव्हिडंट फंड (provident fund)खात्याचे इ-नाॅमिनेशन (e-nomination)कसे करावे.

Spread the love

प्रॉव्हिडंट फंड खात्याचे  इ-नाॅमिनेशन करणे अत्यंत गरजेचे आहे .जेणेकरून भविष्यात प्रॉव्हिडंट फंड खात्याबद्दल अडचण निर्माण होणार नाही. जर तुम्हीसुद्धा प्रॉव्हिडंट फंड खात्याचे  इ-नाॅमिनेशन केले नसेल तर खालील प्रकारे तुम्ही इ-नाॅमिनेशन सोप्या पद्धतीने करू शकता .

1)सर्वप्रथम खाली दिलेल्या वेबसाईट द्वारे तुम्हाला प्रॉव्हिडंट फंड पोर्टलवर जावे लागेल.

https://unifiedportal-mem.epfindia.gov.in

त्यानंतर खालील प्रकारे member e- seva नावाचे पोर्टल उघडेल.

2) यामध्ये तुम्हाला तुमचा युएएन(UAN) क्रमांक भरावा लागेल व पासवर्डद्वारे लॉग इन करावे लागेल.3) पासवर्ड माहिती नसल्यास फॉर्गोट पासवर्ड द्वारे तुम्ही पासवर्ड बदलून घेऊ शकता.4) सर्वप्रथम तुमचे खाते उघडल्यानंतर तुम्हाला tab view द्वारे प्रोफाइल वर जावे लागेल.5) त्यानंतर चेंज फोटो द्वारे तुमचा फोटो अपलोड करावा.6) त्यानंतर मॅनेज  टॅब  मध्ये जावे . यामध्ये  इ-नाॅमिनेशन या ऑप्शन वर जावे.7) यामध्ये having a family मध्ये yes पर्याय निवडावा.

8) त्यानंतर नॉमिनी चे सर्व डिटेल्स भरावी -जसे आधार नंबर, खाते क्रमांक, नाॅमिनी चे फोटो इत्यादी.( तुम्ही एकापेक्षा जास्त सुद्धा नाॅमिनी ठेवू शकता.) 

9) शेवटी सर्व डिटेल्स भरून झाल्यानंतर माहिती सेव्ह करावी व नाॅमिनीचे शेअर पर्सेंट भरावे.

10) शेवटी ई -साईन (e- sign )द्वारे तुमचे आधार क्रमांकावर आलेल्या ओटीपी द्वारे माहिती प्रमाणित करावी.

         अशाप्रकारे स्टेटस मध्ये  नाॅमिनेशन सक्सेसफुल झालेले दिसेल.

Leave a Reply

Your email address will not be published.