Can you invest in crypto currency |काय तुम्ही क्रिप्टो करंसी मधे गुन्तवनुक करू शकता?

Spread the love

प्रथम जाणून घेऊया की क्रिप्टो करन्सी(crypto currency)काय आहे?

क्रिप्टोकरन्सी किंवा क्रिप्टोचलन  हे आभासी चलन आहे. हे चलन  संगणकाच्या अल्गोरिदमवर तयार केले जाते. हे एक डिजिटल चलन आहे ज्यासाठी क्रिप्टोग्राफी वापरली जाते.साधारणपणे कोणत्याही वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा सेवा खरेदी करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो.या  चलनास बरेच देशांची मान्यता आहे तर काही देशांची मान्यता नाही. भारतात मात्र नजीकच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने यावरील बंदीला सैल केल आहे.   क्रिप्टोकरन्सी चा वापर अलीकडच्या काळात खूप वाढत चालला आहे. नवीन पिढीची त्यामध्ये खूप रुची दिसून येते. काही वर्षातच क्रिप्टो करेंसी ची किंमत गगनाला भिडली आहे. त्याचे एक उदाहरण म्हणजे बिटकॉइन होय.

क्रिप्टो करेंसी मध्ये तुम्ही कशा प्रकारे इन्वेस्ट करू शकता ? 

तर या प्रश्नाचे उत्तर आहे –होय 

तुम्हीसुद्धा क्रिप्टो करेन्सी मध्ये इन्व्हेस्ट करू शकता.भारतात क्रिप्टो करेंसी मध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. भारतातील जवळपास आठ टक्के नागरिकांनी डिजिटल करन्सी मध्ये इन्व्हेस्ट केले आहे .  सध्या आलेल्या डेटा नुसार भारतातील जवळपास दीड करोडच्या वर नागरिकांनी यामध्ये गुंतवणूक केलेली आहे .नजीकच्या काळात क्रिप्टो करेंसी मध्ये इनवेस्ट करणाऱ्यांचे भारतातील प्रमाण 10 बिलियन डॉलर ला पार केले आहे.  शेअर मार्केट किंवा स्टॉक मार्केट प्रमाणेच क्रिप्टो करेंसी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण भारतात वेगाने वाढत चालले आहे. ज्याप्रमाणे तुम्ही डिमॅट अकाऊंट द्वारे स्टॉक खरेदी करता त्याप्रमाणे  बरेचसे ॲप द्वारे तुम्ही सुद्धा क्रिप्टो करेंसी मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. स्टॉक मार्केट किंवा शेअर मार्केट प्रमाणेच क्रिप्टो करेंसी मध्ये सुद्धा जोखीम आहे म्हणून विचारपूर्वक व अभ्यास करून यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे. गुंतवणूक करताना फक्त बिटकॉइन किंवा विविध क्रिप्टो करेंसी चे वधारलेले भाव बघू नये सर्व बाबींचा अभ्यास करून गुंतवणूक केली पाहिजे. भविष्यात क्रिप्टो करेंसी चा वापर मोठ्या प्रमाणात वाढू शकतो असे तज्ञांचे मत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.